Share
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि आनंदाचा विषय आहे. अनेक मंडळे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून सेवा करत असतात. हा गणेशोत्सव तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर करणारा ठरो. व त्याचबरोबर प्रत्येक गणेश भक्ताच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच गणेशाकडे प्रार्थना आहे, असे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले आहे.
कसबा बावडा येथील सम्राट गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचे उद्घाटन करून ते बोलत होते. मंगळवारी सम्राट मित्र मंडळाच्या गणेश मंडपाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व ए. एच. मोतीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोतीवाला बोलत होते.
प्रारंभी ऋतुराज पाटील रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्या हस्ते फीत कापून मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी मोतीवाला यांचा सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मोतीवाला म्हणाले की, सम्राट मित्र मंडळाने नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. यावर्षी त्यांनी आकर्षक देखावा उभा केला असून गणेश भक्तांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. सम्राट मित्र मंडळाची ही परंपरा कायम सुरू राहावी. यावेळी राहुल चव्हाण, पवन चव्हाण, ऋषिकेश पाटील, वैभव चव्हाण, शुभम चव्हाण, मानसिंग चव्हाण, विश्वजित चव्हाण यांची उपस्थिती होती.
Post Views:
619
Belgaum Varta Belgaum Varta