सुनील कांबळे यांची माहिती : प्रा. जोगेंद्र कवाडे, मेघराज काटकर यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : समता सैनिक दलातर्फे निपाणीत रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता डॉ. आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन परिवार वाद – संवादचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रिपाईसोचे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. अविनाश कट्टी, प्रा. अच्युत माने, डॉ. श्रीकांत वराळे, अशोककुमार असोदे, प्रा. शरद कांबळे, अनिल म्हमणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दलाचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.
अध्यक्ष कांबळे म्हणाले, समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चालणारी संघटना आहे. निपाणी परिसरात याची व्याप्ती वाढत आहे. निपाणी परिसर चळवळीचे शहर म्हणून ओळखले जाते. निपाणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जागविण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे नवयुवक चळवळीशी जुळावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगीतले. महादेव कांबळे यांनी, रिपब्लिकन हा विचार आहे. विना राजकीय पद्धतीने फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार धारेची ही संघटना आहे. 11 रोजी होणार्या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. शरद कांबळे, दीपक वंटे, प्रा. संजय कांबळे, कुमार कांबळे, विलास माळगे, अभि शिंगे, चेतन सनदी, प्रसाद खोडे, मिलींद तेरदाळे, नितीन कांबळे, शुभम कांबळे, अलंकार कांबळे, विवेक कांबळे, किरण जिरगे, राजू मोरे, प्रशांत कांबळे, शशि शिरगावे, गौतम हुक्केरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पी. टी. कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta