कोगनोळी : सुळगांव तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील शिक्षक डी. ए. मूराळी व एल. वाय. जाधव यांना 2019-20 सालातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉक्टर गोरखनाथ चौगुले होते.
मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात डी. ए. मुराळी व एल. वाय. जाधव यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी प्रशांत मगदूम व उमेश मगदूम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच देणगी दिल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या उमा कांबळे, गौतम पोवार, नवनाथ चौगुले, तुळशीदास पाटील, अशोक कांबळे, गुरुप्रसाद कांबळे, राजाराम पाटील, तानाजी गुरव, काजल पाटील, शिक्षक एस. एच. लोखंडे, एस. बी. चौगुले यांच्यासह विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन डी. ए. मुराळी यांनी तर आभार एस. बी. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta