जिल्ह्यातील चर्चेला पूर्णविराम : मंत्री, खासदारांचे योगदान
निपाणी (वार्ता) : पडलिहाळ येथील बहुचर्चित प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सदर पीकेपीएसची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी मार्गदर्शन करताना दिलेल्या पाठबळातून ही संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली.
गेल्या पाच वर्षापासून या पीकेपीएसचे राजकारण बेळगाव जिल्ह्यात चर्चेत होते. सत्ताधारी सर्व संचालकांचे अर्ज निवडणुकीत रद्दबातल ठरविले गेल्याने जिल्हयात ही पीकेपीएस लक्षवेधी ठरली होती. पण गेल्या महिन्यापूर्वी संघाचे अध्यक्ष संजय स्वामी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करताना काँग्रेसला यावेळेपासून सोडचिठ्ठी दिली. निवडणूक बिनविरोध होणार असे बोलले जात होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताना यावर सर्वच्या सर्व 12 संचालकांनी शिक्का मोर्तब केल्याने संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
संजय स्वामी, विनायक सासणे, मधुकर पाटील, महादेव पाटील, राजेंद्र जाधव, दिलावर मुल्ला, राजेंद्र पाटील, दगडू कांबळे, केरबा नाईक,अनुराधा पाटील, गीता भोसले, मंगेश उर्फ विश्वजीत मगदूम अशी बिनविरोध निवड झालेले संचालकांची नावे आहेत. बिनविरोध निवडीनंतर खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांचा सत्कार झाला. हालशुगरचे संचालक समित सासणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Belgaum Varta Belgaum Varta