Monday , September 21 2026
Breaking News

मच्छे-वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था

Spread the love

बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावरून जाताना भयानक खड्ड्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य जनतेकडून रस्ता दुरुस्तीसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
मच्छे येथील रहिवासी राम पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना खड्ड्यांमुळे ते दुचाकीवरून पडून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात आमदार अभय पाटील यांचे कार्यकर्ते संतोष जैनोजी यांनी आणि सहकार्‍यांनी आज त्या भागाला भेट देऊन पाहणी केली आणि तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन आम. अभय पाटील यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *