Sunday , September 22 2024
Breaking News

धनलक्ष्मी सौहार्द संस्थेला 47.53 लाखाचा नफा

Spread the love

 

अध्यक्ष रवींद्र शिंदे : 24 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : कोरोना आणि महापूर काळात सलग दोन वर्षांपासून व्यवसाय आणि बाजारपेठेतील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे. तरीही सभासद ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यासाठी सर्वांचा हातभार लागला आहे. प्रामाणिक संचालक मंडळ व कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांमुळे सतत ही संस्था नफ्यात आहे. पुढील वर्षी संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्या पार्श्वभूमीवर संस्थेची नवीन इमारत उभी करण्याचा मानस आहे. यंदा आवड सालात संस्थेला 47 लाख 53 हजारावर निवळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक रविंद्र शिंदे यांनी दिली. शुक्रवारी दुपारी धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या झालेल्या वार्षिक सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाले. संचालक सुनील काळगे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सेक्रेटरी अनिल भोसले यांनी, अहवाल वाचनात संस्थेकडे 14 कोटी 45 लाख 37 हजारावर ठेवी, 9 कोटी 22 लाख 95 हजारावर गुंतवणूक, 9 कोटी 20 लाख 20 हजारावर कर्ज वितरण केले असून 47 लाख 53 हजारावर निव्वळ नफा झाला आहे. यंदाचा लाभांश जाहीर झाला असून तो सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. सभासदांच्या हितासाठी या पुढील काळात विविध योजना राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी सभासद व माजी सभापती विश्वास पाटील, ओंकार शिंदे, महेश शिंपुकडे, राजेश शेडगे, गोपाळ नाईक व सभासदांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर खवरे, सुनील वाडकर, महेंद्र सांगावकर, सुनील काळगे, अनिल सांगावकर, सुभाष कुकडे, राहुल शिंदे, ज्योतिबा खवरे, परशराम कांबळे, सुनीता शिंदे सुप्रिया चोरगे, गजेंद्र तारळे, डॉ. विनय निर्मळे, संजय चोरगे, विजय आवटे, विनय साळोखे, बाबुराव शेटके, आनंदराव जाधव, आकाश खवरे, सुहास दुधाने, रवींद्र इंगवले, शिवाजी पठाडे, प्रमोद माने, सोमेश येरुडकर, संतोष व्हडगे, विजय कदम, स्मिता चिंचली, भास्कर आजरेकर यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. नितीन साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. मंगल वाडकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया

Spread the love  नामदेव चौगुले : लोकसह‌भागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *