सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार रत्न व अरिहंत संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील दादा हे होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणारे महान कर्मयोगी होते. रयत शिक्षण संस्था म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सध्या शरदरावजी पवार हे आहेत.
कर्मवीरांनी संस्था चालवत असताना कोणत्याही जातीपातीचा विचार न करता सर्व समावेशक विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षण देण्याचे काम केले.
दादा पुढे म्हणाले, महाराष्ट्र शिवाय आपल्या या कर्नाटक राज्यातील दोन शाखा देखील लोक सहभागातूनच चालवल्या जात आहेत आणि याच भावनेतून येथील कमिटीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे अपूर्ण असलेल्या हॉलचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजे 12 लाख रुपयाची देणगी जाहीर करून त्यांनी सौंदलगा भिवशी आडी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होईल यादृष्टीने सौंदलगा हायस्कूलवर व रयत शिक्षण संस्थेवर असणारे त्यांचे प्रेम स्पष्ट केले.
या कार्यक्रमात सुरुवातीला स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले, अभियंता, अरिहंत को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा सौंदलगाचे चेअरमन सुदेश बागडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अंकिता माळी, सरिता पाटील, अस्मिता शेवाळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सहाय्यक शिक्षक एस. व्ही. यादव यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमादरम्यान कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची लेझीम व ढोलांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन भिवशी येथील प्रतिष्ठित नागरिक शिक्षण प्रेमी रतन मोहन मेळवंकी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी शहीद जवान प्रमोद म्हातुगडे यांचे वडील बाबासो म्हातुगडे यांनी विद्यालयाला 21000/ देणगी दिली तर रतन मोहन मेळवंकी यांनी 7500 देणगी दाखल दिले.
या कार्यक्रमात बाबासो म्हातुगडे यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
तसेच विद्यालयातील विज्ञान शिक्षक टी. बी. साळुंखे यांच्या स्मरणार्थ विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. सागर माळी यांनी द्रोणाचार्य शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. ती शिष्यवृत्ती म्हणजेच 2500 रुपये प्रत्येकी असे सरिता संदेश पाटील व प्रणव वसंत कुंभार या दोन विद्यार्थ्यांना देण्यात आली.
अनेक शिक्षण प्रेमींनी दिलेल्या देणगीतून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यांचे निवेदन एम. जी. बोरगे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य अजित पाटील संदीप नाईक, यांच्यासह संजय पाटील, धनाजी भेंडुगळे, आप्पा कारंडे, प्रभाकर आरेकर, प्रकाश आरेकर, गंगाधर शिंत्रे, पंचायत सदस्या शेवाळे, ऐवाळे कुरली येथील बंडा पाटील, कोगनोळी येथील प्रकाश गायकवाड, सर्व शिक्षक आजी-माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन रूपाली खाडे यांनी तर आभार सविता कुरले यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta