संस्थेची दोन कोटी 58 लाखाची उलाढाल
हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात बारा वर्षापासून असलेल्या प्राथमिक कृषी सहकारी संघ नियमित हंचिनाळ या संघाची 2021-22 सालची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अरुण लक्ष्मण चौगुले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे आणि ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष शरद चौगुले हे होते.
संस्थेच्या कार्यालयास संपन्न झालेल्या सभेच्या प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत पाटील यांनी स्वागत करून अहवाल वाचनात म्हणाले की. संस्थेने 85 लाख कर्ज वितरण केले असून 13 लाख 83 हजार शेअर भांडवल असून एकूण निधी 11 लाख 37 हजार आहे तर 17 लाख 59 हजार गुंतवणूक असून 49.149 निव्वळ नफा झाला असून संस्थेची दोन कोटी 58 लाख रुपयाची उलाढाल झाल्याचे सांगितले.
यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संचालक मंडळाने समाधानकारक उत्तर दिल्यामुळे सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली.
यावेळी बोलताना संस्थेचे मार्गदर्शक श्री. अनिल कुरणे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेने इतर उपक्रम सुरू करून संस्था अधिकाधिक नावारूपाला आणली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेने प्रत्येक सभासदाचे हित जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी संस्थेने संलग्न व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे चेअरमन अरुण चौगुले म्हणाले की, संस्थेने आत्तापर्यंत 85 लाखाचे कर्ज वितरण केले असून भविष्यात प्रत्येक शेतकर्याची पत वाढवून ज्यादा कर्ज देऊन शेतकर्याला सहकार्य करण्याचे संस्थेचे धोरण असल्याचे सांगितले.
या सभेला उपाध्यक्ष राजाराम कोंडेकर, संचालक अजित पाटील, विजय नलवडे, उमेश गुरव, सदाशिव कांबळे, पोपट खोत, रामगोंडा चौगुले, बाबासो मजगे, सौ. वैशाली अनिल कुरणे, सौ. भारती अरुण चौगुले, दयानंद पाटील, दीपक पाटील, सिद्धू वंदूरे, अशोक कोंडेकर, दत्ता पोवार, मलगोंडा नलवडे, संजय वंदुरे, आनंदा चौगुले, मलगोंडा नलवडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta