कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्यावतीने शालेय साहित्याची वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी बंडा पाटील हे होते.
विलास गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महाराष्ट्र युवा एकीकरण समिती यांच्यावतीने मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना बंडा पाटील म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने सीमाभागांमध्ये मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच घालावे मराठी शाळेत शिकलेली अनेक मुले आज चांगल्या पदावर काम करत आहेत. इंग्लिश मीडियम व इतर माध्यमातून शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाता येते असे असणारा समज चुकीचा आहे. प्रत्येकाने मराठी भाषा व भारतीय संस्कृती टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले.
यावेळी बोलताना धनंजय ढोबळे म्हणाले, मराठी भाषा व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी समितीच्या वतीने सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. समितीच्या कार्यामध्ये कोगनोळी येथील दानशूर व्यक्तीने मोठी देणगी दिली आहे. सर्व देणगीदार व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्यावतीने चांगले काम होत आहे.
यावेळी समितीचे सदस्य लक्ष्मीकांत पाटील, हिंदुराव मोरे, आदेश पोवार, राहूल पाटील यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta