Monday , April 20 2026
Breaking News

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

Spread the love

 

पटियाला : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.
या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला 26 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लाँडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *