आमदार प्रकाश हुक्केरी : 23 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : आण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोरगाव येथीलश्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 45 लाख 39 हजार 310 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे. त्यामुळेच हि संस्था जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे, असे मत शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते.
आमदार हुक्केरी म्हणाले, ग्रामीण भागासह सीमाभागातील शेतकरी, सामान्य जनतेला कमी व्याज्यात दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्यता करून त्यांची प्रगती करण्यासाठी व नोकरदार, व्यावसयिक यांच्या अन्य ठेवीला एक विश्वसनीय संस्था लाभावी यासाठी बोरगांवसारख्या ग्रामीण भागात श्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास व प्रामाणिक व्यवहार, संचालक मंडळाची काटकसर व सेवक वर्गाचा निस्वार्थी कामकाजमुळेच संस्थेने अल्पावधीत प्रगती करत सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात गरुड भरारी घेतली आहे.
यावेळी माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी आम. काकासाहेब पाटील, सुभाष जोशी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
संस्थेचे अहवाल सालात एकूण 3087 सभासद असून भाग भांडवल 1 कोटी 59 लाख, 20 हजार, 100 रूपये आहे. संस्थेचा 08 कोटी 37लाख, 53 हजार, 586 रूपये निधी आहे. शिवाय संस्थेने 76 कोटी, 51 लाख, 57 हजार, 193 रुपये इतक्या अवाढव्य ठेवीवर, 41 कोटी, 86 लाख, 69 हजार, 376 रुपये इतकी मुबलक कर्जे देऊन लाख, 39 हजार, 310 रुपये इतका निव्वळ नफा मिळविला असल्याचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब हवले यांनी अहवाल वाचनात सांगितले.
अहवाल सालात 1 कोटी, 45 लाखाचे भाव भांडवल, 39 कोटी, 16 लाख रुपये गुंतवणूक, 332 कोटी, 3 लाख, इतकी वार्षिक उलाढाल असल्याचे प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांनी सांगितले. राजू खिचडे यांनी स्वागत केले.
सभेस नगरसेवक शरद जंगटे, उपाध्यक्ष सुकुमार चित्रे, सुरेंद्र पाटील, आण्णासाहेब मालगावे, विद्याधर अम्मनवर, शिवाप्पा माळगे, रामचंद्र फिरगनावर बाळाराम खोत, सुभाष गोरवाडे, संजय बंकापुरे, रशीद मोमीन, स्मिता माळी, पद्मश्री बंकापुरे, विजयकुमार शिंगे, संजय हवले, शिवाजी माळी, अरुण देसाई, अॅड. संतोष चौगुले, टी. आर. पाटील, संजय जंगटे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते.