Monday , September 21 2026
Breaking News

अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व जंगलमय भागातील अबनाळी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या तीन बुद्धिबळपट्टूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
नुकताच बैलहोंगल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत अबनाळी शाळेच्या बुद्धिबळपट्टूनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अप्रतिम खेळ दाखविला. यामध्ये बुद्धिबळपट्टू श्रीधर धनापा करंबळकर, मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडिलकर यांनी प्रथम क्रमांकासह विजय संपादन केला. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यांना अबनाळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरव, रमेश कवळेकर व इतर शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. तर एसडीएमसी अध्यक्ष व सदस्याचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *