Saturday , June 6 2026
Breaking News

हरुरीत महिला मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : डोकेगाळी व हरुरी (ता. खानापूर) गावामध्ये महिला मेळावा विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडला.
यावेळी विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोणी असू दे त्यांनाच निवडून द्या असे म्हणत रयत महिला मेळावामध्ये त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विठ्ठलराव हलगेकर प्रत्येक गावागावांमध्ये महिला मेळावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त प्रत्येक गावामध्ये मुलांना टी-शर्ट वाटप, हळदी कुंकू कार्यक्रम सुरुवात केलेली आहे. हरुरी गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये महिला वर्ग व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी आकाश अथणीकर, शभरमानी पाटील, सदानंद पाटील, यल्लाप्पा तिरवीर, चांगाप्पा निलजकर, श्रीपाद उशीलकर, रवी पाटील, हरूरी गावातील मरू पाटील तसेच युवा कार्यकर्ते महिला मंडळाचे सदस्य बहुसंख्य आणि उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *