27 व्या मूर्तीची प्रतिष्ठापना : दर्शनासाठी भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील दक्षिणाभिमुख श्री दुर्गामाता नवरात्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली.
आकाश घुगरे, सुरज चव्हाण (गुंड्या) व प्रथमेश घाटगे यांच्याकडून देवीची उत्सव मूर्ती देण्यात आली. रविवारी (ता. 25) सायंकाळी 6 वाजता श्रीदुर्गा देवी मुर्तीचे आगमन झाले. सोमवारी (ता. 26) सायंकाळी 6 वाजता देवीची शास्त्रोक्त महापूजा व घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर आंदोलन नगरातील माऊली भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
मंगळवार (ता. 27) सायंकाळी सहा वाजता नेहा अमित कामत व शसानिका प्रविण कामत व परिवार यांचे हस्ते देवीची पूजा व आरती आरती झाली. नटराज गणेश उत्सव मंडळ, माणिक भुवनचे कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री 8 वाजता मुला-मुलींची संगीत खुर्ची व लिंबू चमचा स्पर्धा व दांडीया स्पर्धा पार पडली.
बुधवारी (ता. 28) सायंकाळी 6 वा. आशा सुरज पाटील व पाटील परिवार निपाणी यांचे हस्ते पूजा व आरती आरती होणार आहे. यावेळी विघ्नहर्ता तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रात्री 8 वा. दांडिया होणार आहे.
गुरुवारी (ता. 29) सायंकाळी 6 वा. स्नेहा विकास कदम व अनिता आप्पासाहेब पांडव व परिवारच्या हस्ते पूजा व आरती होईल. रात्री 8 वा. मुली व महिलांकरिता संगीत खुर्ची स्पर्धा व दांडीया होणार आहे. आरती विजय वैष्णव व कावेरी महिला बचत गट महिलांकडून आरती, शनिवारी (ता.1) नेहा अक्षय जठार व प्रतिक्षा कुणाल घाटगे व परिवार निपाणी यांचे हस्ते पूजा व आरती, मंडळ बुदिहाळ रात्री 8 वा. कॉमेडी कार्टून अनिकेत शिंदे यांचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.2) सायं. 6 वा. ऐश्वर्या हर्षद मालगांवे व दिपाली प्रविण चौगुले व परिवार यांचे हस्ते पूजा व आरती, रात्री 8 वा. लहान मुला-मुलींचे रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत.
सोमवारी (ता. 3) सायंकाळी 5वा. श्री दुर्गा देवीचा जागर स्त्रीशक्ती महिला संघ, निपाणी यांचे हस्ते पूजा व आरती, सायंकाळी 7 वा. महिलांसाठी देवीस कुंकूम् आर्चन (देवीस कुंकवाचा अभिषेक) व सुहासिनीसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम व दांडीया.
मंगळवारी (ता 4) सायं. 6 वा. (खंडेनवमी), अश्विनी नितीन रणदिवे व कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला प्रतिनिधी निपाणी तालुका यांचे हस्ते पूजा व आरती, रात्री 8 वा. दांडिया, बुधवारी (ता.5) सायं 7 वा. एसकेएम गर्ल्स, प्रगती नगर, आंदोलन नगर, निपाणी यांचे हस्ते पूजा, आरती व विजयादशमी होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta