युवा नेते उत्तम पाटील : दूध उत्पादक संघाची 47 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाकडून गेल्या अनेक वर्षापासून दूध उत्पादक व शेतकर्यांसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा व दूध उत्पादकांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात, यासाठी सतत प्रयत्नशील असणार्या निस्वार्थी संचालक मंडळ व कर्मचार्यांमुळे सीमाभागात अरिहंत दूध संघ नावलौकिक मिळवित आहे. पुढील काळात दूध उत्पादक व शेतकर्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत संघाचे विद्यमान संचालक युवानेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.
बोरगाव येथील अरिहंत सभागृहात श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची 47 वी वार्षिक सभा पार पडली. संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सहकारत्न रावसाहेब पाटील यांची सलग चार वेळा दक्षिण भारत जैन सभेवर अध्यक्षपदी म्हणून बिनविरोध निवड झाली. तसेच संघाचे विद्यमान संचालक युवा नेते उत्तम पाटील यांना पुणे येथील साखर उद्योगातर्फे युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी अहवाल वाचन करताना संघात एकूण 414 सभासद असून, 1 लाख 81 हजार चे भाग भांडवल आहे. 17 लाख 68 हजारांचा निधी असून 40 लाख 58 हजाररुपयांचे ठेव आहे. त्याचबरोबर विविध बँक खात्यात 1 लाख 60 हजार शिल्लक असून 4 लाख 94 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. सभासदांना म्हैस खरेदीसाठी 4 लाख 91 हजार रुपयांचे कर्ज वितरण केले असून, ऍडव्हान्स म्हणून बिनव्याजी 21 लाख 91 हजार रुपये दिले आहे. वर्ष अखेर 2 लाख 97 हजार 734 लिटर दूध संकलन केले आहे. तसेच दूध उत्पादकांना 5 लाख 8 हजार रुपयांवर बोनस वितरण केले असून संघास अहवाल सालात 2 लाख 95 हजार रुपयांचा नफा झाल्याचे कवटे यांनी सांगितले.
यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, संघाचे अध्यक्ष मायगोंडा पाटील, उपाध्यक्ष शिवाजी तोडकर, संचालक शितल हवले, रमेश माळी, हिराचंद चव्हाण जयपाल कोरवी, अजित सावळवाडे, अनिल बुलबुले, सुदर्शन पाटील, सिकंदर आफराज, आर. टी. चौगुला यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta