अध्यक्षा अश्विनी मगदूम : वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत, महिलांनी सुसंस्कृत कुटुंब निर्माण केले पाहिजे. त्या सुसंस्कृत कुटुंबातून चांगले समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे, या हेतूने गौरी गणेश पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन प्रत्येक महिला सभासदांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरणासाठी विशेष असे प्रयत्न केल्याचे गौरी गणेश महिला सहकारी संघाच्या अध्यक्षा अश्विनी मगदूम यांनी सांगितले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक अभयकुमार मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. संस्थेत 868 सभासद असून 3 लाख 43 हजार रुपयांचे शेअर भांडवल, 3 कोटी 75 लाख 41 हजाराच्या ठेवी, विविध बँकांमध्ये 2 कोटी 29 लाख 53 हजारांची गुंतवणूक केली आहे. संस्थेकडून 1 कोटी 44 लाख 19 हजारांचे कर्ज वितरण केले आहे. तर संस्थेस अहवाल सालात 1 लाख 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अश्विनी मगदूम यांनी दिली.
यावेळी युवा नेते उत्तम पाटील, उपाध्यक्ष सुजाता पाटील, संचालिका शोमा हवले, प्रिती पाटील, आशाराणी पाटील, विनयश्री बसन्नवर, रेवती पाटील, मीनाक्षी रोड, लक्ष्मी कांबळे, कलावती खोत, सावित्री शिरदवाडे, सरोजनी मगदूम, विद्या पाटील, सुषमा मगदूम, जास्मिन मुजावर, सरोजनी फिरगन्नावर, प्रियांका वठारे, सुनिता सनदी, छबुताई माळगे उपस्थित होते. चांदबी मुजावर यांनी स्वागत तर आरती बंकापूरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta