निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नवी दिल्ली येथे तब्बल वर्षभर आंदोलन झाले होते. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधातील काळ्या कायद्याची दखल घेऊन शेतकरी विरोधी कायदा मागे घेतले. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर येथील महात्मा गांधी विचार संरक्षण मंच, मावळा कोल्हापूर, शिवराज मंच कागल यांच्यातर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील नेते भूपेंद्र सिंग रावत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील विविध शेतकरी आंदोलनातील नेते व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी छत्रपती शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटील, यांच्यासह प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आठवी व दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील नेते भूपेंद्रसिंग रावत यांनी आपल्या व्याख्यानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ॲड. सूर्याजी पोटले, भगवान गायकवाड, भारती पोवार, अभिषेक मिठारी, उमेश पोवार, इंग्रजीत घाटगे, विक्रम भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta