निपाणी (वार्ता): शहर आणि परिसरात दसर्यानिमित्त विविध ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. येथील सोमनाथ मंदिर येथे दसर्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शमीच्या पानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नगरसेवक संजय सांगावकर, दिलीप पठाडे, शिरीष कमते, दत्ता लाटकर, रमेश भोईटे, कुमार गोरवाडे व नागरिक उपस्थित होते.
वीरशैव समाजाच्यावतीने विद्या संवर्धक मंडळाच्या मैदानावर विजयादशमी साजरी करण्यात आली. लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात कल्याण महोत्सव साजरा करण्यात आला. हुडको कॉलनी, प्रगतीनगर येथेही सीमोल्लंघन साजरे करण्यात आले. बिरदेव नगर येथील सिद्धेश्वर बिरदेवास सोने वाहण्यासाठी शहर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शहरात बुधवारी दुपारी चार नंतर पावसाचे आगमन झाले होते. पाऊस गेल्यावर नागरिकांनी विविध देवतांचे दर्शन घेतले. बिरदेव मंदिरात दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. नगराध्यक्ष जयवंत भाटले नगरसेवक व मान्यवरांनी देवाचे दर्शन घेतले. हिंदू खाटीक समाजातर्फे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
शिवाजीनगर येथील अंबाबाई देवस्थानच्यावतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. भवानी मातेची नऊ दिवस देवीची विविध रूपात पूजा मांडण्यात आली होती. विजया दशमीनिमित्त अंबाबाई देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री साडेदहा वाजता रामलीला मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रावण दहन करण्यात आले. नगरसेवक विलास गाडीवडर, उद्योजक दिलीप चव्हाण, श्रीराम सेनेचे अध्यक्ष नीलेश हत्ती, प्रवीण केस्ते, प्रसाद औंधकर, यांच्यासह श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम मूर्तीचे पूजन आप्पासाहेब सुगते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पांडुरंग भिसे, गणेश भोसले, विठ्ठल सुगते, रामचंद्र मस्के, श्रीकांत आवरेकर, ओमकार विटेकरी, कुमार आवरेकर, राजू भोसले, संजय डिगरे, विनायक भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta