सुधाकर सोनाळकर : दौलतराव पाटील फाउंडेशनतर्फे सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : सर्वच मुलांमध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात. शालेय पातळीवर या गुणांची वाढ होत असताना शिक्षकाकडून त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे अनेक मुले विविध खेळासह अभ्यासात पुढे जातात. त्यासाठी आता पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत सुधाकर सोनाळकर यांनी व्यक्त केले.
गोकाक येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या .या स्पर्धेमध्ये ४४ किलो वजन गटात शिवतेज भरत पाटील, ५२ किलो वजन गटात प्रणव नवनाथ देसाई (बुदिहाळ) यांची मॅटवरील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक घेऊन सुवर्ण पदक पटकविले. त्यांची विजापूर येथे होणाऱ्या कर्नाटक राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालीआहे. तर श्रेयश पठाडे याची बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त येथील दौलतराव पाटील मळा मधील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन हेल्थ क्लब आणि मळा ग्रुपतर्फे आयोजित सत्कार समारंभात सोनाळकर बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निकु पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला. प्रशांत रामणकट्टी यांनी, सध्याच्या युगात मोबाईलची गरज बनली असली तरी विद्यार्थ्यांनी गरजेपुरताच त्याचा वापर केला पाहिजे. त्याशिवाय अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडे वळल्यास आरोग्य सुदृढ होत असल्याचे सांगितले. प्रा. भारत पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी मैदानी खेळासह गड किल्ल्यावर ना भेट देऊन इतिहास जाणून घेण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्रेयस पठाडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास शशीकुमार गोरवाडे, सुरेश घाटगे, चंद्रकांत माळगे, जे. डी. शिंदे, सागर पाटील, नारायण यादव, विकास देसाई, अमर कूट, दयानंद पाटील, आशिष पाटील यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन हेल्थ क्लबचे पदाधिकारी व मळा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta