सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
सुरुवातीला ट्रॅक्टरचे पूजन चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते होऊन संचालक आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यानंतर बोलताना चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, संघाचे सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना संघाकडून आम्ही ट्रॅक्टर वितरण करीत आहोत. संघाच्या स्व -भांडवलातून 13 टक्के व्याजाने आम्ही ट्रॅक्टरसाठी कर्ज वितरण केले असून, यासाठी सभासद शेतकऱ्यांची तीन ते चार एकर जमीन आवश्यक आहे. याबरोबरच या अगोदर संघाकडून एका ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आलेले आहे हा दुसरा ट्रॅक्टर सभासद शेतकऱ्यास दिला जात आहे. संघाने कर्नाटक सरकारकडे ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याजात सूट मागितली आहे. ती सूट मिळाल्यानंतर कर्जदार सभासदाच्या खात्यावर वर्ग केली जाईल. त्याबरोबरच संघाकडून शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
यावेळी व्हा. चेअरमन डॉ. संजय आडसूळ, महादेव कांबळे, सबगोंडा पाटील, संभाजी साळुंखे, भारतसिंग रजपूत, बी.आर. चौगुले, विमल पाटील, अंजना नाईक, राजश्री मोरे, सचिव बाळासाहेब रणदिवे, धोंडीराम बावचे, दिलीप आडसूळ, विश्वास पाटील, संतोष शिंदे, नरसिंगा कुंभार, सुनील बोरगावे, रघुनाथ मोरे यासह सभासद उपस्थित होते. शेवटी आभार संचालक डॉ. तानाजी पाटील यांनी मांनले.
फोटो-ट्रॅक्टर किल्लीचे वितरण करताना चेअरमन संजय शिंत्रे व उपस्थित मान्यवर.
Belgaum Varta Belgaum Varta