Saturday , November 7 2026
Breaking News

उचगावात हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Spread the love

 

उचगाव : येथील श्री मळेकरणी स्पोर्ट्सतर्फे आयोजित प्रकाशझोतातील खुल्या हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) झाले.
ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार अध्यक्षस्थानी होते. तुरमुरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक प्रवीण देसाई, व्यवस्थापक सुधाकर करटे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाईक, कुमार लोहार, अशोक गोंधळी, बबलू सनदी, नवीन सनदी, मनोहर पावशे, सूरज होनगेकर, तबरेज तहसीलदार, यासीन जमादार
प्रमुख पाहुणे होते. अध्यक्ष जमादार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
स्पर्धेसाठी पहिले बक्षीस २१ हजार गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक प्रवीण देसाई यांनी तर दुसरे बक्षीस ११ हजार रुपये ग्राम पंचायत माजी अध्यक्ष उमेश कदम-पाटील यांनी पुरस्कृत केले आहे.
यावेळी बोलताना प्रवीण देसाई म्हणाले की, मोबाईलमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात आहे त्यामुळे मैदानी खेळाचा विसर मुलांना पडत आहे. मुलांनी मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे.
यावेळी गजानन नाईक,
हनुमंत बुवा यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मनोहर पावशे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *