प्रा. नानासाहेब जामदार : अर्जुनी वाचनालयात गुणवंतांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : वाचन हा जीवनातील अविभाज्य घटक असला पाहिजे. वाचनातून मिळणारे ज्ञान कुठेच मिळत नाही. हताश व निराश झालेल्या जीवाला उभारी देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके जगण्याची उर्मी देतात. यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन देवचंद कॉलेजचे प्रा. नानासाहेब जामदार यांनी केले. अर्जुनी येथील सुशीला मगदूम ग्राम वाचनालयतर्फे गुणवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा सुतार होत्या.
प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी, वाचनालयाच्या 28 वर्षांच्या कार्याचाआढावा घेतला. प्रा. जामदार पुढे म्हणाले, पुस्तके जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ देतात. सकारात्मक विचारातूनच जगण्याचे बळ मिळते. विद्यार्थ्यांनी विशेषतः तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता मोबाईलचा वापर सकारात्मकतेने करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी अभिषेक तुपारे, संजीवनी सारंग, प्रथमेश देसाई यांचा यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णू चौगुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात स्वच्छंदी पेडणेकर, अभिषेक तुपारे, अभिषेक देसाई, सानिका सुतार, बाजीराव चौगुले, के. एम. पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपसरपंच सुनील देसाई, ग्रा. पं. सदस्य सुदाम देसाई, वाचनालय संचालक सज्जन कांबळे, संतोष मिसाळ, जयसिंग देसाई, महादेव चौगुले, राजाराम पेडणेकर, सुनील उन्हाळे, महादेव पेडणेकर, विजय देसाई, प्रदीप पोवार, पांडुरंग देसाई, जोतीराम यादव यांच्यासह ग्रामस्थ, वाचक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी सहाय्यक विश्वनाथ देसाई यांनी केले. ग्रंथपाल जोतिराम मिसाळ यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta