कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भर दिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 21 रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील हॉटेल व्यावसायिक आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार मोडून घरामध्ये असणारे पाच तोळे सोने व रोख रक्कम लंपास केली. घरातील तिजोरी व अन्य साहित्य इतरत्र टाकून देण्यात आले होते.
दुपारी तीन वाजता घराचे दार मोडले असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच मेंथे यांना घटनेची माहिती दिली. घरी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.
भर दिवसा चोरी झाल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta