Sunday , July 26 2026
Breaking News

जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम निकृष्ट दर्जाचे, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन महिना गेला तरी वाहतुकीस योग्य रस्ता न झाल्याने याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
विद्यानगर, मयेकर नगर वसाहतीतील नागरिकांना बसस्थानकाला जाण्यासाठी, तसेच बाजाराला जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. दुसरीकडे कच्चा रस्तावर पाणी साचून वाहन रूपात आहेत. त्यामुळे वाहनाचे नुकसान होत आहे.
जांबोटी रस्त्यावरील सीडीेचे काम ही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.
त्यातच वेळ काढूपणा केला जात आहे. शिवाय सीडीपीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी सुध्दा टाकली नाही. त्यातच याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
तेव्हा नागरिकांची समस्या दुर करण्यासाठी सीडीेचे काम
उत्कृष्ट दर्जाचे होणे गरजेचे होते. पण ती ही निकृष्ट दर्जाचे पूर्ण करून आता रस्ता अर्धवट व ना दुरूस्त करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजीचे सुर उमटत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *