Saturday , November 7 2026
Breaking News

आप्पाचीवाडी येथे भर दिवसा चोरी

Spread the love

 

कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भर दिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 21 रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील हॉटेल व्यावसायिक  आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार मोडून घरामध्ये असणारे पाच तोळे सोने व रोख रक्कम लंपास केली. घरातील तिजोरी व अन्य साहित्य इतरत्र टाकून देण्यात आले होते.
दुपारी तीन वाजता घराचे दार मोडले असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच मेंथे यांना घटनेची माहिती दिली. घरी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.
भर दिवसा चोरी झाल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *