Monday , December 8 2025
Breaking News

हुन्नरगी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उत्तम पाटील गटाचा करिष्मा

Spread the love

 

वृषभ चौगुले ९७ मतांनी विजयी : कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर शुक्रवारी (ता. २८) पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सोमवारी (ता.३१) येथील तहसीलदार कार्यालयात झाली. यावेळी भाजप व काँग्रेस उमेदवारांना पराभूत करत उत्तम पाटील गटाचे उमेदवार वृषभ सुनील चौगुले यांनी ९७ मतांनी विजय मिळवला. याठिकाणी तिरंगी लढत होऊनही उत्तम पाटील गटाचा करिष्मा दिसून आला.
सोमवारी सकाळी ८ वाजता निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. ९.४५ वाजता मतमोजणी पूर्ण झाली. त्यामध्ये बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील गटाचे ऋषभ चौगुले यांना ६६५ पैकी ३०१ मते मिळाली. भाजप पुरस्कृत उमेदवार आशिष खोत यांना २०४ तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजू मुल्ला यांना १४७ मते मिळाली. विजयानंतर हुन्नरगी येथे उत्तम पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत मते १३ बाद झाली.
नूतन सदस्य ऋषभ चौगुले म्हणाले, आमचे वडील सुनील चौगुले हे चार वेळा ग्रामपंचायतमध्ये निवडून आले त्यांनी आपल्या कारकिर्दीत गावात अनेक महत्त्वाचे कामे केली होती. त्यांचा आशीर्वाद आणि युवा नेते उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन, सहकार्य, मतदारांनीही साथ दिल्यामुळे विजय झाला आहे. युवा वर्ग उत्तम पाटील यांच्या पाठीशी जोडला जात असून ग्रामपंचायत सदस्य या नात्याने उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी कार्यरत राहू. यापुढे काळात गावात विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेसांगितले.
यावेळी प्रमोद पाटील, अमर स्वामी, सुरज किल्लेदार, डॉ. शितल चौगुले, दत्तात्रय किल्लेदार, माणिक पाटील, प्रमोद पाटील, पिंटू जमादार, सौरभ बेरड, विठ्ठल कांबळे, दावत मुल्ला, सुरेश कोल्हापुरे, सुरज किल्लेदार, बसू बरगाले, महादेव मुरदंडे, राजू अंबी, बजरंग कापसे, विठ्ठल सुतळे, राहुल मुरदंडे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *