निपाणी (वार्ता) : सन २०२१-२२ गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा. चालू गळीत हंगामातील ऊसाचा दर जाहीर करूनच यंदाचा हंगाम सुरू करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे राज्याध्यक्ष चुनापा पुजारी, चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली कारखानदारांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, मागील हंगामात नाही प्रतिटन पहिला हप्ता म्हणून २७०० रुपये दिले आहेत. उर्वरित दुसरा हप्ता ३०० रुपये हप्ता प्रमाणे मिळावेत. चालू हंगामासाठी ३५०० रुपये प्रतिटन निश्चित करण्यात यावे. एफआरपीमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन केले पाहिजे. शेतकऱ्यांचे पशुधन आणि पिकांना त्यांच्या कारखान्यातील कचऱ्याचा फटका बसू नये यासाठी व्यवस्थापनाने काळजी घ्यावी. चालू हंगामासाठी अनेक साखर कारखाने व चालू आहे. त्यामुळे त्यांनी गतवर्षीचा दुसरा हप्ता व चालू हंगामामधील दर पाच दिवसाच्या आत जाहीर करावा.
ज्या शेतकर्यांना वजनातील तफावतीबाबत शंका असेल त्यांनी खाजगी वजनकाट्याने वजन केलेले ऊस खरेदी करण्यास संकोच करू नये.
शेतकऱ्यांनी स्वतः तोडणी करून ऊस कारखान्यात आणला तर वाहन लगेच रिकामे करून द्यावे. ऊस तोडणीसाठी आलेले मजूर हे १००,२०० रुपये प्रति टन दराने करत असून व्यवस्थापनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी.
सप्टेंबरमध्ये असलेली लावणी नोव्हेंबरमध्ये तशीच भरली जाणार आहे. याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
यावेळी हिडकल येथील संगम सहकारी साखर कारखाना, संकेश्वर येथील हिराशुगर, बागेवाडी येथील विश्वनाथ कट्टी साखर कारखान्यासह विविध कारखान्यांना निवेदन देण्यात आले. संगम कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गणेश एळगेर, सत्त्याप्पा मल्लापूर, शिवलिंग पाटील शिवानंद मोगलीहाळ, रमेश पाटील, चिनू कुळवडे, वासू पंढरोळे, सुरेश फिरगनावर, संजीव बोभाटे, मल्लाप्पा बैलान्नवर, नागराज हादिमानी, मोहम्मद बडाकारा, रवी चिक्कोडी, रामण्णा मंडीवाला, सातू खेमाला, अप्पासाहेब खेमाला, रमेश माडीवाला, महादेव हादगीनाल, केम्पण्णा नागनूरी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta