Monday , September 21 2026
Breaking News

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 2 टप्प्यात मतदान, 8 डिसेंबरला मतमोजणी

Spread the love

 

नवी दिल्ली : गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *