तब्बल महिन्यानंतर मिळाला निपाणीला अधिकारी : सत्यनायक यांच्या बढतीमुळे पद होते रिक्त
निपाणी : गेल्या महिन्यात निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांना पोलीस उपाधीक्षक पदी बढती मिळाली होती. त्यामुळे महिनाभरापासून निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या काळात बेळगाव येथील पोलीस ठाण्यातील आय. एस. गुरुनाथ यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. महिनाभरामध्ये निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदासाठी विविध प्रकारच्या चर्चेला ऊत आला होता. अखेर निपाणीच्या मंडल पोलिस निरीक्षक पदी बेळगाव येथील पोलीस आयुक्तालय आखत्यार्यातील मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी प्रभारी मंडल पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांच्याकडून बुधवारी (ता. 9) पदभार स्वीकारला.
गेल्या महिन्यापासून निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या काळात प्रभारी मंडल पोलीस निरीक्षक म्हणून आय. एस. गुरुनाथ यांनी काम पाहिले होते.
संतोष सत्यनायक यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनुभवाच्या जोरावर निपाणी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखली होती. पण त्यांना बढती मिळाल्याने निपाणीचे पद रिकामे होते. आता निपाणीसाठी स्वतंत्र मंडल पोलीस निरीक्षक मिळाले असून लवकरच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होईल असा आशावाद शहरवासीयातून व्यक्त होत आहे.
संगमेश शिवयोगी हे मूळचे कुडलसंगम येथील असून त्यांनी यापूर्वी बेळगाव मार्केट आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कार्य केले आहे. तसेच लोकआयुक्त कार्यालय आणि रायचूर, कोप्पळ, गुलबर्गा अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. नियुक्ती झाल्यामुळे ते प्रथमच निपाणी शहरात आले आहेत. त्यामुळे या भागातील माहिती घेऊन कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी ’बेळगाव वार्ता’शी बोलताना सांगितले.
यापूर्वी शिवयोगी हे बेळगाव आणि परिसरात सेवा बजावल्याने त्यांना मराठी भाषा अवगत असून निपाणी भागातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Check Also
मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
Spread the love बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत बेळगाव येथील रुग्ण पुष्पलता दामोदर …