बेळगाव : न्याय आणि कर्माचा देव म्हणून ओळखला जाणारा शनी देव रविवार दि. १३ जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे. त्या नंतर शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करेल. एकूण १३१ दिवस शनी वक्री स्थितीत राहणार आहे. शनी वक्री स्थितीत राहिल्यामुळे त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल असे परिणाम पुढील …
Read More »LOCAL NEWS
रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा शुक्रवारी अधिकारग्रहण समारंभ…
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वर्ष २०२५ -२६ साठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी सायं. ४:०० वाजता, लॉर्ड्स इको इन, बेलगाम येथे होणार आहे. या समारंभात नूतन अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर, कोषाध्यक्ष …
Read More »विविध मागण्यांसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने
बेळगाव: कर्नाटक राज्य महानगरपालिकेने दहा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर आज महापालिका कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. आज बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे कर्नाटक राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ …
Read More »बेंगलोर येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात विजय मोरे यांचा सत्कार
बेळगाव : राजधानी बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एका विशेष राज्यस्तरीय समारंभात सार्वजनिक सेवा आणि समाजाला मदत करण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगावचे माजी महापौर आणि आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समुदाय साहित्य मत्तू संस्कृती प्रतिष्ठान, बेंगलोर आणि श्री सिद्धगंगा मठ, तुमकुरू यांनी या …
Read More »यादगिरीत दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू
सहा जणांची प्रकृती गंभीर बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी …
Read More »दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी बेळगाव, गुलबर्ग्याच्या आमदारांशी चर्चा; सुरजेवाला यांनी जाणून घेतल्या तक्रारी
जाहीर वक्तव्य न करण्याची ताकीद बंगळूर : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कॉंग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज सुरवात केली. पहिल्या टप्यात बेळगाव आणि गुलबर्गा काँग्रेस आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कोणत्याही आमदाराने पक्ष अडचणीत येईल असे …
Read More »बेळगावहून गोव्याला बेकायदेशीररित्या घेऊन जाणारे गोमांस जप्त, बेळगाव येथील दोघांना अटक
रामनगर : बेळगावातून गोव्याला बेकायदेशीररित्या घेऊन जात असलेले अंदाजे 6 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचे 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक मुख्य आरोपी फरार आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सिद्धप्पा …
Read More »श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन आयोजित “अभंगवाणी”ला उत्स्फूर्त दाद
बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे आयोजित भक्तीरसपूर्ण “अभंगवाणी” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्वरांजलीचे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले. त्यांना सिंथेसायझरवर संतोष पुरी, तबल्यावर नारायण गणाचारी व ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी अप्रतिम साथसंगत दिली. प्रारंभी …
Read More »कोनेवाडीत भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी शिवसेना नेते विजय देवणे यांना जामीन
बेळगाव : कोनेवाडी (ता. जि बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील ५ जणांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केला होता. त्यांच्यापैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे हे आज सोमवारी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात हजर झाल्यामुळे …
Read More »मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांकडूनच वकिलाचे अपहरण करून खून; रायबाग तालुक्यातील घटना
रायबाग : मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांनीच एका वकिलाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात घडली असून या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta