बेळगाव : बेळगावात उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्यभरातून सुमारे 4000 पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. 8 डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवर्णसौधमध्ये होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी धारवाड, बागलकोट, उडपी, पीटीएस प्रशिक्षण केंद्र अशा विविध …
Read More »LOCAL NEWS
जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी विजय बांदिवडेकर, रविंद्रनाथ जुवळी, डॉ.श्रेयश चौगुले, अशोक कदम, …
Read More »चलो व्हॅक्सिन डेपो; मराठी भाषिकांचा उद्या महामेळावा होणार!
बेळगाव : 2004 साली महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नी खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाव वर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरण्याचा कुटील डाव रचला होता. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अशाप्रकारे अधिवेशन हे लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य कृत्य आहे तरी देखील कर्नाटक सरकारने बेळगावात …
Read More »सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा देसूर येथे मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम
बेळगाव : सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा, देसूर येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य व शिक्षण-स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश गोरल यांनी शाळेला धावती भेट देऊन पाहणी केली. या वेळी शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्ष प्रशांत पाटील, राज्यस्तरीय अडथळा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थीनी प्राजक्ता पाटील तसेच मराठा शिक्षक संघाच्या वतीने आदर्श …
Read More »सरकारी शाळांतील इलेक्ट्रॉनिक खरेदीत महाघोटाळा; लोकायुक्तांचे छापे, लाखोंची फसवणूक उघड
बंगळूर : शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या विविध कार्यालयांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात मोठा खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात राज्यभरातील हजारो सरकारी शाळांमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीत कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. बंगळुर उत्तर विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी(डीडीपीआय) यांच्या अखत्यारीत एकूण १,४८३ सरकारी शाळा असून, प्रत्येक …
Read More »कारवार तुरुंगात गुंडांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला
बंगळूर : कारवार जिल्हा कारागृहातील दोन गुंडांनी आज सकाळी तुरुंग अधीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हल्ला झालेल्या तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिकडेच, तुरुंगात कैदी आणि अंडरट्रायल कैदी विलासी जीवन जगत असल्याचे आरोप झाले आहेत. या संदर्भात, गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तुरुंगात कोणत्याही प्रतिबंधित वस्तू येऊ नयेत असे …
Read More »मराठी भाषेतील स्वागत फलक कन्नड संघटनांकडून टार्गेट!
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या स्वागताकरिता भाजपाचे माजी आमदार ऍड. अनिल बेनके यांनी स्वागत फलक लावले होते. या स्वागत फलकावरील मजकूर मराठी असल्याने मराठी भाषेची कावीळ असलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर फलक शनिवारी फाडून एक प्रकारे मराठी भाषेचा अवमान केला आहे. कित्तूर कर्नाटक सेनेच्या …
Read More »धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने 8 डिसेंबर 2025 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी 06/12/2025 रोजी ठिक 9 वाजता कलमेश्वर मंदिर बस स्टॅप येथे बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील हे होते. मनोहर जायानाचे, यल्लाप्पा रेमानाचे यांनी विचार मांडले. यावेळी शिवाजी पाटील, विजय बाळेकुंद्री, सतीश …
Read More »महामेळाव्याला मोठ्या संख्येने सामील व्हा : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावमध्ये ८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार असून, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही वर्षे बेळगाववर आपला अधिकार दाखवण्यासाठी आणि त्याद्वारे तीव्रतेने कन्नड भाषासक्ती राबविण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध म्हणून आणि सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील …
Read More »मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये “अवयवदान” विषयावर सेमिनारचे आयोजन
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आज शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी “अवयवदान” या महत्त्वपूर्ण विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी व वक्ते म्हणून डॉ. कृष्णाजी वैद्य, सहायक प्राध्यापक, रचना शरीर विभाग, एस. एन. व्ही. व्ही. एस. संचलित एस. व्ही. जी. आयुर्वेदिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta