बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णसौध येथे अधिवेशन घेतले त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे २०१७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी घेतली नाही, म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. ३ रोजी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये होती. मात्र, …
Read More »LOCAL NEWS
खडक गल्ली परिसरात दगडफेक
बेळगाव : बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली. दरवर्षी, शनिवारी खुंट आणि जलगार गल्लीमार्गे उरूस मिरवणूक काढण्यात येते. मात्र या वर्षी परवानगीशिवाय मिरवणूक खडक गल्लीत दाखल झाली. या परिसरात कधीही न आलेली मिरवणूक आता का आली आहे? असे काहींनी विचारले …
Read More »भाषा टिकविण्यात पत्रकारांचे योगदान मोठे; सार्वजनिक वाचनालयातर्फे चर्चासत्र संपन्न
बेळगाव : “वृत्तपत्रे म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज होय. भाषा टिकविण्याचे आणि वाढविण्याचे कार्य करण्यामध्ये वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे” असा सूर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या चर्चासत्रात उमटला. येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन आणि अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाने झाला. सार्वजनिक वाचनालयाचे …
Read More »उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर यांचे निधन
बेळगाव : उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष, बालवीर सेवा मंडळाचे संस्थापक सदस्य, बालवीर अर्बन संस्थेचे संस्थापक चेअरमन, बालवीर विद्यानिकेतनचे संचालक, ढेकोळकर ट्रेडर्सचे मालक, व तालुका पंचायत माजी सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष गीता ढेकोळकर यांचे पती, ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा ढेकोळकर (KG) यांचे वडील बंधू यल्लाप्पा गावडू …
Read More »शिरोडा-वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले : तिघांचे मृतदेह सापडले; ४ जण बेपत्ता
सिंधुदुर्ग : शिरोडा-वेळागर समुद्रात संध्याकाळी ४.४५ वाजता ८ पर्यटक बुडाले. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात आले; मात्र ३ जण मयत झाले आणि १ महिला गंभीर अवस्थेत शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचावपथक मार्फत सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील खानापूर, लोंढा आणि …
Read More »युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत …
Read More »चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदून गटारी भरल्या मातीने; नागरिक डासांनी हैराण
बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने वडगाव चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदण्यात आली. मात्र कुपनलिका खोदून या ठिकाणची माती गटारीतच पडून राहिली आहे. त्यामुळे गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे तक्रारही नोंदवली. दरम्यान वीस दिवस उलटूनही गटारीतील …
Read More »मुख्यमंत्र्यांनी उद्याच नवीन जिल्ह्याची घोषणा करावी : खास. इराण्णा कडाडी
बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शनिवारी बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवीन जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. अनेकदा निवेदन …
Read More »पीक नुकसानीची भाजप नेत्यांनी केली पाहणी
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी भागात मुसळधार पावसामुळे गाजर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. “पिकांच्या नुकसानीमुळे आम्ही मोठ्या अडचणीत आहोत, मात्र आमची व्यथा ऐकण्यासाठी मंत्री किंवा …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरात सीमोल्लंघन उत्साहात संपन्न
बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरमध्ये दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. आज सायंकाळी वडगाव, जुने बेळगाव व अनगोळ भागातून आलेल्या पालख्यांचे व हजारो भक्तांचे स्वागत मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकारी यांनी केले. उशिरापर्यंत परिसरातील नागरिकांनी सीमोल्लंघनाचा आनंद लुटला.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta