Sunday , July 26 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे “डॉक्टर दिन” साजरा

Spread the love

 

बेळगाव : डॉक्टर दिनाच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे मलप्रभा हॉस्पिटल येथे एक कार्यक्रम करण्यात आला. या वेळी डॉ. महांतेश वाली आणि डॉ. स्वेता वाली यांचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. दोन्ही डॉक्टरांना स्मृतीचिन्ह, फुले, गोडधोड आणि भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. त्यांनी जायन्ट्स सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी डॉक्टर वाली यांच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष सचिन केळवेकर, फेडरेशन सेकरेटरी प्रवीण त्रिवेदी, फेडरेशन उपाध्यक्ष श्रीधन मळीक, सदस्य एम गंगाधर, प्रशांत सुगंधी, अभिषेक वाइंगडे, आणि सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी हा खास दिवस आनंदाने साजरा केला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *