
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ शुक्रवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृह ज्ञान संगम, येथे होणार आहे. याद्वारे २५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचा पहिला भाग आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस. विद्याशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटकचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गहलोत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री अजय कुमार पद्मश्री प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत समारंभाचे भाषण देतील. या प्रसंगी व्हीटीयू प्रतिष्ठित व्यक्तींना “डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करणार आहे. या कार्यक्रमात पदवी आणि संशोधन पदवी एम.एससी. (इंजिनिअरिंग) संशोधन आणि एकात्मिक दुहेरी पदवी) या पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. पदवीधरांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात विलंब होऊ नये म्हणून अनेक कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था प्रवेश घेताना पदवी प्रमाणपत्रे सादर करण्याचे निर्देश देत असल्याने २०२३ पासून विद्यापीठाने एका वर्षात दोन दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी २५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचा पहिला भाग आयोजित करण्यात आला होता कर्नाटकला जागतिक स्तरावरील अभ्यासाचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी व्हीटीयूने उच्च दर्जाच्या परदेशी विद्यापीठांशी संशोधन, अध्यापन सहयोग आणि प्राध्यापक, विद्यार्थी देवाणघेवाण सुलभ करणे यासारखे अनेक उपाय केले आहेत. असेही त्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta