Sunday , July 26 2026
Breaking News

उषाताई पिसे यांचे मरणोत्तर देहदान

Spread the love

 

बेळगाव : बसवाण गल्ली, खासबाग येथील नागरिक उषाताई मनोहर पिसे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर देहदान व नेत्रदान करण्यात आले.
त्यांच्या निधनानंतर नितीन खटावकर यांनी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे माजी अध्यक्ष सुनील मुतगेकर यांच्याशी संपर्क साधला आणि नेत्रदान व देहदान करण्याविषयी कळविले त्यानुसार बेळगाव वैद्यकीय महाविद्यालयाशी (बिम्स) संपर्क साधून नेत्रदान करण्याविषयी प्रक्रिया डॉ. ईशा भट्ट व डॉ. अमुल्या यांनी तर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर शास्र विभागात डॉ. महातेश रामण्णवर यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.याकामी जायंट्स आय फौडेशनचे संचालक प्रदीप चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी जायंट्स आय फौडेशनचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व संचालक संजय पाटील उपस्थित होते.
कै.उषाताई पिसे यांच्या पश्चात दोन चिरंजीव, एक कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *