Monday , September 21 2026
Breaking News

पालकांनी लग्नास संमती न दिल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या!

Spread the love

 

बेळगाव: पालकांनी लग्नाला संमती न दिल्याने दोन प्रेमीयुगुलांनी ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गोकाकच्या बाहेरील चिक्कनंदी गावात घडली.

मुनवळ्ळी येथील रहिवासी राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजीता चोबारी (२६) हे मृत प्रेमीयुगुल यांच्यात प्रेम आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पालकांच्या संमतीने रंजिताचे दुसऱ्या मुलाशी लग्न जमवले होते. या निराश्येमुळे नाराज झालेल्या प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली. आज सकाळी एकाच ऑटोमधून दोघे एका निर्जन भागात गेले तिथे त्यांनी ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून मुलाचा खून केल्याचा आरोप केला. त्यामुळे योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *