Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

येळ्ळूर ग्रा.पं.तर्फे परमेश्वरनगरात अतिक्रमण हटाव मोहीम

    बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे परमेश्वरनगर, येळ्ळूर येथील तुकाराम गल्ली भागात आज शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. येळ्ळूर परमेश्वरनगर येथील प्रभाग क्र. 8 व 9 मधील तुकाराम गल्लीसह परिसरात ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी भरत मासेकर आणि पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी प्रभागाचे लोकनियुक्त …

Read More »

‘वसुंधरा’ मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव, शाहूनगर (प्रतिनिधी) : कंग्राळी बी.के. रोडवरील सदगुरु वामनराव पै कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘वसुंधरा मंगल कार्यालय’ या अद्ययावत मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १५ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात चव्हाण परिवारच्या मातोश्री श्रीमती विमल भरमा …

Read More »

दोन कारच्या समोरासमोरील धडकेत; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  बागलकोट (दिपक शिंत्रे) : हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) …

Read More »

निवडणुकीनंतर राजकारण नाही, फक्त विकास : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. निवडणुकीनंतर राजकारण नसते, केवळ विकास असतो, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. बेळगुंदी येथे भव्य श्री रवळनाथ मंदिराच्या वास्तुशांत समारंभा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्यात सहभागी होऊन, कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. मी फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण करते, …

Read More »

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात उघड झाल्यानंतर, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर निर्णायक कारवाई केली अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या तळांवर …

Read More »

रोटरी इलाईटतर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट आणि चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी मंदिर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी 17 मे 2025 रोजी सायंकाळी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैली’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकर …

Read More »

कुराण जाळणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचा एल्गार!

  चन्नम्मा सर्कल येथे हजारो मुस्लिम समर्थक रस्त्यावर; निषेध मोर्चात तरुणांची घोषणाबाजी बेळगाव : तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील मशिदीत कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांना जाळणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत मुस्लिम समुदायाने शुक्रवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे मोठे आंदोलन केले आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तत्पूर्वी, दुपारची नमाज पूर्ण …

Read More »

संतीबस्तवाड प्रकरण : ग्रामीण पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ निलंबित

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात कुराण धर्मग्रंथ चोरी आणि जाळल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, कुराण जाळल्याप्रकरणी सीपीआय …

Read More »

ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भाजपच्या तिरंगा यात्रेला प्रतिसाद

  बंगळूर : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ आज प्रदेश भाजपने बंगळुरमध्ये तिरंगा यात्रा काढली. त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बंगळुरातील मल्लेश्वरम येथील शिरूर पार्क ते मल्लेश्वरम येथील १८ व्या क्रॉस रोडपर्यंत निघालेल्या या तिरंगा यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते आर. अशोक, राज्य भाजप प्रभारी …

Read More »

राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर लोकायुक्तांचे छापे

  अनधिकृत संपत्तीचा शोध; महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास बंगळूर : सात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळी राज्यातील विविध भागात छापे टाकले. बंगळूर, बंगळूर ग्रामीण, तुमकुर, यादगीर, मंगळूर आणि विजयपुर येथे एकाच वेळी छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सात भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकाच वेळी जाळ्यात …

Read More »