बेळगाव, शाहूनगर (प्रतिनिधी) : कंग्राळी बी.के. रोडवरील सदगुरु वामनराव पै कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘वसुंधरा मंगल कार्यालय’ या अद्ययावत मंगल कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १५ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात चव्हाण परिवारच्या मातोश्री श्रीमती विमल भरमा चव्हाण आणि कु. वसुंधरा य यल्लाप्पा चव्हाण यांच्या शुभहस्ते फित सोडून मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सौ. नागुली व श्री. नानाजी हिरोजी (मामा), कलखांब यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे विधिवत पूजन झाले.
“चंद्रभागा बाळाराम चव्हाण भोजन कक्ष”चे उद्घाटन श्री. हणमंत बाळाराम चव्हाण (काका) व सौ. कमल हणमंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ऑफिस विभागाचे उद्घाटन इंदोर येथील बटाटा व्यापारी अभिनव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच “विमल भरमा चव्हाण सभागृह” चे उद्घाटन सौ. मलप्रभा व श्री. मारूती कित्तूर, अष्टे (मामा), श्रीमती सिंधू ईश्वर गुरव (कुद्रेमानी), श्रीमती सुरेखा नेसरकर (खादरवाडी) आणि श्रीमती लक्ष्मी पवार (बेळगाव) यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमात एक खास क्षण होता, तो म्हणजे श्री. वाय. बी. चव्हाण (सावकार) यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचा! ५० दिव्यांच्या मंगल औक्षणात व कुटुंबीयांच्या साक्षीने केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा झाला. रणजित चौगुले सर यांच्या शुभेच्छांनी वातावरण भारावून गेले. वाय. बी. चव्हाण यांनी आपल्या मनोगतात भावनिक शब्दांत उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ॲड. सुधीर चव्हाण, शंकर चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, बलराम चव्हाण, संजय ईश्वर गुरव (जावई ) व त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत सौहार्दपूर्णरित्या केले. यामुळे पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश दिसून आला.
या सोहळ्यात एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे तानाजी पाटील व कु. देवयानी पाटील यांच्या कराओके मराठी गीतांच्या सादरीकरणाने रसिकांचे मनोरंजन! कार्यक्रमाचे संयोजन व समरस सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले.
चव्हाण कुटुंबियांचे विविध क्षेत्रांतील व्यावसायिक फर्म आहेत –
१. भरमा चव्हाण अँड सन्स – अडत दुकान, मार्केट यार्ड बेळगाव
२. वसुंधरा किड्स पॅराडाइज इंग्लिश मिडियम स्कूल – कंग्राळी बीके
३. वसुंधरा को-ऑपरेटिव्ह सोसायटी – कंग्राळी खुर्द
४. वसुंधरा ट्रेडिंग कंपनी – भाजी मार्केट बेळगाव
५. वसुंधरा हार्डवेअर – बॉक्सर रोड, बेळगाव
६. युनिव्हर्सल जिम – मजगाव क्रॉस
ही सर्व फर्म्स चव्हाण कुटुंबाच्या व्यावसायिक एकत्रिकरणाचे प्रतीक असून, शिक्षण, अन्नधान्य व्यापार, सहकारी संस्था, किरकोळ व्यापार, बांधकाम साहित्य आणि फिटनेस या विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.
अशा सुसज्ज व सांस्कृतिकतेने नटलेल्या कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, ‘वसुंधरा मंगल कार्यालय’ हे भविष्यातील अनेक मंगल सोहळ्यांचे सुंदर साक्षीदार ठरेल.