Sunday , July 26 2026
Breaking News

दोन कारच्या समोरासमोरील धडकेत; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Spread the love

 

बागलकोट (दिपक शिंत्रे) : हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत

गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) यांचा मृत्यू अपघाताच्या ठिकाणीच झाला होता. यांचाच आणखी एक मुलगा सतीश (२८) हा जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. आज सकाळी हा अपघात घडला.

या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांपैकी आई आणि मुलगा घटनास्थळीच मरण पावले. तर वीरश अंगडी यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात अमिनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. दुसऱ्या कारचा चालकही जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बदामी तालुक्यातील नेलुगी गावचे रहिवासी आहेत. अमिनगड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *