Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

  बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल …

Read More »

ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जींची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते …

Read More »

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात…

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील दरूरजवळ माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कार आणि मालवाहू वाहनामध्ये अपघात झाला. लक्ष्मण सवदी हे अथणीहून गोकाक मार्गे बंगळुरूला जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका मालवाहू वाहनाची धडक झाली. सुदैवाने लक्ष्मण सवदी धोक्यातून बचावले. अपघातानंतर लक्ष्मण सवदी दुसऱ्या कारने बंगळुरूला निघाल्याचे कळते. …

Read More »

शेतकऱ्यांनी बांधलेल्या रस्त्यावर अडथळा : संतप्त शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कलारकोप्प येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने अडथळा निर्माण केल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीतील कलारकोप्पचे …

Read More »

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एशियन स्पर्धेसाठी निवड झालेल्या देवेन बामणेचा सत्कार

  बेळगाव : सप्टेंबर महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या एशियन रोलर स्केटिंग स्पर्धेत भारतीय संघात निवड झालेल्या बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर देवेन बामणे याचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार कर्नाटक राज्याचे क्रीडा अधिकारी श्री. चेतन आर. आय पी एस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा राजीनामा मागितला का?

  चेंगराचेंगरीवर जारकीहोळीनी केला कर्नाटक सरकारचा बचाव बंगळूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. हे केंद्र सरकारचे अपयश नाही का? विरोधी पक्ष म्हणून आपण पंतप्रधानांचा राजीनामा मागितला होता का? असा भाजपवर हल्लाबोल करताना कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी प्रश्न केला. चिक्कमंगळूर येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या …

Read More »

राज्य सरकारच्या बरखास्तीसाठी भाजपची निदर्शने; आज घेणार राज्यपालांची भेट

  बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीच्या घटनेत आकरा जणांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी आज विधानसौध परिसरात गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यासाठी उद्या (ता. ९) राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंगराचेंगरीच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार …

Read More »

गणेशपूर मेन रोडवर कचऱ्याचे साम्राज्य!

  बेळगाव : गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर “कचरा फेकू नये” असा सूचना फलक लावलेला असतानाही, नेमक्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर लावलेल्या या …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीने सुरेश रोटी यांचा सत्कार

  उचवडे : उचवडे (ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक सुरेश रोटी हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यामुळे उचवडे येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा हृधसत्कार करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कलमेश्वर युवक संघाचे अध्यक्ष व्ही. एन. …

Read More »

बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशनची कमिटी जाहीर

  बेळगाव : बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने आज रविवार दि. 8 रोजी सर्वसाधारण बैठक शिवबसव प्लाझा फुलबाग गल्ली येथे घेण्यात आली. संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मागील वर्षांतील जमाखर्च सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने नवीन कमिटीची निवड करण्यात आली. नवीन कमिटी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी चेतन ताशीलदार तर …

Read More »