Sunday , July 26 2026
Breaking News

भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने पार पडला विवाह!

Spread the love

 

बेळगाव : धार्मिक रीतीरिवाजांना फाटा देऊन भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने शहरात एक अभिनव व ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह संविधानाची शपथ घेऊन पार पडला, ज्याने सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे.

ऍड. विशाल चौगले (वर) यांचा विवाह अजित कणगलेकर यांची कन्या आरती (वधू) यांच्याशी रविवारी (तारीख ८ जून) येथील महात्मा गांधीभवन येथे संपन्न झाला. या विवाहसोहळ्याचे सर्वात महत्त्वाचे व क्रांतिकारक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक ‘मंगलाष्टक’ व ‘अक्षतारोपण’ सारख्या धार्मिक विधींना दिलेला फाटा. त्याऐवजी, पुष्प अर्पण करून चौगले कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुसरण करून भारतीय संविधान आणि त्याची उद्देशिका (प्रियाम्बल) यांच्या नावाने प्रतिज्ञा घेतली.

वर-वधूंना ऍड. श्यामसुंदर पत्तार व ऍड. नागरत्ना पत्तार यांनी संविधानाची शपथ घालून दिली. ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर नववधू-वरांना भारतीय संविधानाची एक प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. संविधानाची प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर वधू-वरांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांसमोर अभिवादन केले. हा क्षण उपस्थित सर्वांच्यासाठी भावुक करणारा होता.
विवाह सोहळ्यासाठी जमलेल्या मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, नेते व नागरिकांनी या अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *