Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने साखरमंत्र्यांची बेळगावात एंट्री!

  बेळगाव : ऊस दराच्या वाढत्या तणावामुळे राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी आज, गुरुवारी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विशेष निर्देशानुसार हुबळीहून थेट बेळगावला धडक दिली. बेळगावात दाखल होताच, त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि साखर आयुक्तांना एका गोपनीय ठिकाणी बोलावून तात्काळ बैठक घेतली. शेतकरी संघटनांकडून घेराव आणि प्रतिबंधाची शक्यता असल्याने मंत्र्यांचा हा …

Read More »

कंग्राळी बुद्रुकमध्ये धर्मांतराच्या आरोपांवरून ग्रामपंचायतीला घेराव

  बेळगाव : धर्मांतराच्या गंभीर आरोपांवरून बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक येथे संतप्त नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घातला. लोकांची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी केली. कंग्राळी बुद्रुक येथे सुमारे पाच वर्षांपूर्वी एका विशिष्ट धर्माची स्वतःला धर्मगुरू म्हणवणारी व्यक्ती वास्तव्यास …

Read More »

चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा शुभारंभ

  बेळगाव : हॉकी नेहमीच भारतीय लोकांचा आहे आणि हा उत्सव प्रत्येक चाहत्यासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येकासाठी आहे, असे उदगार उद्घाटक बसवेश्वर बँकेच्या माजी चेअरमन शैलजा जयप्रकाश भिंगे यांनी काढले. हॉकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त हॉकी बेळगावने लेले मैदानावर आयोजित केलेल्या चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. …

Read More »

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  दहावीची पहिली परीक्षा १८ मार्च, बारावीची पहिली परीक्षा २८ फेब्रुवारीला बंगळूर : दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयुसी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने आज दहावी, बारावी परीक्षा-१ आणि २ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. दहावी परीक्षा २३ मार्च ते २ एप्रिल दरम्यान …

Read More »

शुभम शेळके यांच्या सोबतची सेल्फी आली अंगलट; पोलीस निरीक्षकाची बदली

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फी घेतल्याचे प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले. या प्रकारामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बी. आर. गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

भारत हॉकीच्या वैभवाचा उद्या बेळगावात शताब्दी महोत्सव

  बेळगाव : भारतीय हॉकीच्या वैभवाचा शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३०.वा. शताब्दी महोत्सव टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र लेले मैदानावर संपूर्ण होणार आहे. हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित कार्यक्रमास यावेळी खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू शेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी …

Read More »

शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय तापमान वाढले

  मुख्यमंत्री बदल, सत्ता वाटपावरून काँग्रेसमध्ये खळबळ बंगळूर : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. “नोव्हेंबर क्रांती”, मंत्रिमंडळ फेरबदल आणि सत्तावाटप या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या आजच्या दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे. शिवकुमार आज दुपारी ३ वाजता दिल्लीला रवाना झाले असून, त्यांनी सिंचन …

Read More »

रस्त्यावर बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांना हटवण्यासाठी पोलिसांची मोहीम

  बेळगाव : बेळगाव शहरात रस्त्यालगत अनेक ठिकाणी वाहने बेवारस स्थितीत उभी केलेली आढळून येत आहेत. या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने शहर पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस वाहनांना उचलून पोलीस ठाण्यात जमा करण्यात …

Read More »

ट्रक चालकाची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : तारा नगर, पिरनवाडी, तालुका बेळगांव जवळ अतिवेगाने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी ट्रक चालकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बेळगांव येथील २ रे जे. एम. एफ. सी. न्यायालयाच्या न्यायाधिशांनी साक्षीदारांतील विसंगती लक्षात घेऊन आरोपीची मुक्तता दिली. आरोपी: जोतीबा मधू पाटील, वय ४० …

Read More »

उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी प्रयत्न करा : समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

  बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नी 21 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी त्या बैठकीत सुनावणी पूर्वीच्या सर्व समस्या सुटाव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीसाठी पत्र लिहिल्यानंतर बुधवारी कोल्हापूर मुक्कामी मध्यवर्ती …

Read More »