Monday , September 21 2026
Breaking News

शुभम शेळके यांच्या सोबतची सेल्फी आली अंगलट; पोलीस निरीक्षकाची बदली

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फी घेतल्याचे प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले. या प्रकारामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बी. आर. गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबत पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी कालीमिर्ची यांच्या विरोधात निदर्शने केली होती.

या प्रकरणानंतर अखेर त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून, ही कारवाई त्या सेल्फी प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात जोरात सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *