बेळगाव : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने धार्मिक पर्यटन विकास अंतर्गत दोन मंदिरांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. या अनुदानातून सौंदत्ती येथील रेणुका देवी यल्लमा देवस्थानाचा कायापालट केला जाणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाबद्दल बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत केंद्र सरकारच्या पर्यटन …
Read More »LOCAL NEWS
सध्या राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
इच्छुकांची नाराजी बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त फेटाळून लावले. प्रसार माध्यमे काल्पनिक बातम्या प्रसारित करीत असून त्यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय राजधानीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराबाबत मी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केलेली नाही. माजी मंत्री …
Read More »कळसा-भांडूरी, मेकेदाटू प्रकल्पाला तातडीने मंजूरी द्या
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती बंगळूर।: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मेकेदाटू जलाशय आणि कळसा -भांडूरी प्रकल्पांसाठी तातडीने मंजूरी देण्याबरोबरच अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची विनंती केली. आज दिल्लीतील संसदेच्या संकुलात झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या …
Read More »बेळगाव शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर कार्यालय खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार असून …
Read More »वक्फ भूसंपादनाविरोधात बेळगावात 1 डिसेंबर रोजी जनजागृती आंदोलन
बेळगाव : वक्फ भूसंपादनाविरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या 1 डिसेंबरला बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनात बसनागौडा पाटील-यत्नाळ, प्रताप सिंह, सी. एम. सिद्धेश, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, बी. पी. हरीश, एन. आर. संतोष …
Read More »फेसबुकवर प्रेम… गुपचूप लग्न; महिला सामाजिक कार्यकर्त्यांची फसवणूक
बेळगाव : बेळगावातील एक सामाजिक कार्यकर्त्या त्यांची फेसबुकवर एका शिपायाची ओळख झाली. प्रेमात पडले आणि गुपचूप लग्न केले. आता त्याने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शिपायाच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अन्यायाविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण त्यांना न्याय मिळाला नाही. याबाबत सविस्तर …
Read More »…म्हणे समिती नेत्यांना हद्दपार करा; समितीविरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी बेळगावात कन्नड समर्थक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याला परवानगी मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव समितीला महामेळाव्यासाठी परवानगी देऊ नये, …
Read More »महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई : एडीजीपी एच. हितेंद्र
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी एच. हितेंद्र यांनी दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने …
Read More »चलवेनहट्टी परिसरात भात मळण्या अंतिम टप्प्यात…
बेळगाव : चलवेनहट्टीसह हंदिगनूर, अगसगे, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी केदनूर, कुरीहाळ, बोडकेनट्टी आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा भात पिकाला पुरक असा पावसाळा झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली. परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta