Monday , September 21 2026
Breaking News

महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई : एडीजीपी एच. हितेंद्र

Spread the love

 

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी एच. हितेंद्र यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला कोणत्याही कारणास्तव परवानगी दिली जाणार नाही, मागील वेळीही परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र त्यावेळी त्यांनी सीमेबाहेर कार्यक्रम आयोजिला. यावेळी पुन्हा महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी पोलिस विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अधिवेशनात सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभागासाठी मंजूर पदे भरण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पदांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल, असेही ते म्हणाले.

बेळगावचे आयजीपी प्रकाश कुमार, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन, विजयपूरचे आयजीपी निंबरगी, बागलकोटचे आयजीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *