बेळगाव : बेळगावातील एक सामाजिक कार्यकर्त्या त्यांची फेसबुकवर एका शिपायाची ओळख झाली. प्रेमात पडले आणि गुपचूप लग्न केले. आता त्याने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शिपायाच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अन्यायाविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण त्यांना न्याय मिळाला नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2019 मध्ये, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे यांची बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील शिपाई अक्षय नलवडे याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण अलीकडे अक्षय दुसऱ्या लग्नासाठी तयारी करत असल्याचे समजले. हे समजताच अक्षयच्या बिजगर्णी येथील घरी प्रमोदा हजारे गेल्या असता घरच्यांनी त्यांचे ऐकलेच नाही. अक्षय सध्या भारतीय लष्कराच्या कोलकाता ईस्टर्न कमांडच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. इथे प्रमोदा हजारे यांनी अक्षय नलवडेच्या घरासमोर ठाण मांडून न्यायासाठी उपोषण सुरू केले आहे. मात्र अक्षयचे कुटुंबीय घराला कुलूप लावून तेथून निघून गेले असल्याचे समजते.