Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सीमा समन्वयक मंत्री पदासाठी तिघांच्या नावाचा प्रस्ताव सचिवालयाला सादर…

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान ठाणे येथे आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते श्री. विकास कलघटगी यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन …

Read More »

सेठ फाउंडेशनतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिकाने सन्मान

  बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या एसएसएलसी बोर्ड परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात आमदार सेठ यांनी दिलेल्या …

Read More »

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना

  म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः …

Read More »

विद्यार्थ्यांनी निर्भिडपणे परीक्षेला सामोरे जावे : मुख्याध्यापक पी. आर. पाटील

  बेळगाव : विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, यश नक्की मिळेल. त्यासाठी नियमितपणे सराव करा. चिंतन, मनन करून पूर्ण तयारीनिशी परीक्षेला जा म्हणजे यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी केले. मच्छे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल येथे …

Read More »

नेताजी युवा संघटनेकडून नेताजी सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार

  येळ्ळूर : छत्रपती शिवाजी रोड येळ्ळूर येथील प्रगतशील नेताजी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी डी. जी. पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रघुनाथ मुरकुटे यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक म्हणून संजय मजूकर, प्रा. सी. एम. …

Read More »

जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे पूर्वपरीक्षा मार्गदर्शन

  बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे रविवार दिनांक 16.2.2025 रोजी बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन हायस्कूल मधील दहावीच्या मुलांकरता परीक्षेची पूर्वतयारी म्हणून मराठी व समाज या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. सरदार हायस्कूलचे शिक्षक माननीय श्री. रणजीत चौगुले तसेच बालवीर विद्यानिकेतनचे शिक्षक श्री. डी. डी. …

Read More »

बेळगाव महापालिकेतील आणखी दोन नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता

  नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पालिका कर्माचाऱ्याची लेखी तक्रारीची शक्यता बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दोन नगरसेवकांच्या विरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची शक्यता आहे. या तक्रारीची दखल घेत शहापूर पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांची चौकशी सुरू केली असल्याची शक्यता दबक्या …

Read More »

काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व निर्माण होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य

  सतीश जारकीहोळी यांची सिध्दरामय्यांसाठी फलंदाजी बंगळूर, ता. १५: काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व तयार होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. ते शनिवारी बंगळुरमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, जर कॉंग्रेसला पुढील निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांना सिद्धरामय्या यांची गरज आहे, असे सांगून …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळींच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली मृत मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट

  बेळगाव : शनिवारी दुपारी बेळगावमधील खडेबाजार येथे घडलेल्या खून प्रकरणानंतर बेळगावमध्ये खळबळ उडाली असून फोंड्याचे आमदार मृत लहू मामलेदार यांचे नातेवाईक बेळगावात दाखल झाले आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार केपीसीसी सदस्य आणि मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांनी मृत लवू मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच …

Read More »

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २६ फेब्रुवारी रोजी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक आज शनिवार १५ रोजी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे “मराठी भाषा गौरव दिन सोहळा” नुकत्याच संपन्न झालेल्या …

Read More »