बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे रविवार दिनांक 16.2.2025 रोजी बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन हायस्कूल मधील दहावीच्या मुलांकरता परीक्षेची पूर्वतयारी म्हणून मराठी व समाज या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. सरदार हायस्कूलचे शिक्षक माननीय श्री. रणजीत चौगुले तसेच बालवीर विद्यानिकेतनचे शिक्षक श्री. डी. डी. बेळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात खूपच परिश्रम घेतले. याप्रसंगी व्यासपीठावर जायंटसचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण शिंदे, सेक्रेटरी श्री. मुकुंद महागावकर, खजिनदार श्री. मधु बेळगावकर, संचालक प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, वाय न पाटील, फेडरेशन ऑफिसर श्री. संजय पाटील व श्री. सुनील मुतगेकर, संयोजक श्री. शंकर चौगुले तसेच बालवीर विद्यानिकेतनचे सर्वेसर्वा व जायंटसचे जेष्ठ सभासद श्री. प्रेमानंद गुरव आदी उपस्थित होते.
या प्रसंगी जायंटस अध्यक्ष श्री. यल्लाप्पा पाटील व फेडरेशन ऑफिसर श्री. संजय पाटील यांच्या हस्ते गुरुजन श्री. रणजीत चौगुले व डी. डी. बेळगावकर यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्ष भाषणात श्री. यल्लाप्पा पाटील यांनी बालवीर विद्यानिकेतन हायस्कूलबद्दल खूपच चांगले उदगार काढले व या शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यात प्रायमरी तसेच हायस्कूल मुख्याध्यापिका सौ. रेखा शहापूरकर व सौ. मंगला पाटील व गुरुजन वर्गाचा सिंहाचा वाटा आहे हे त्यांनी येथे मुख्यरित्या नमूद केले. या मार्गदर्शन शिबिराचा 25 दहावीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ. रेखा शहापूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नीता यल्लारी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री. प्रेमानंद गुरव यांचे खूपच सहाय्य झाले.