येळ्ळूर : छत्रपती शिवाजी रोड येळ्ळूर येथील प्रगतशील नेताजी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी डी. जी. पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रघुनाथ मुरकुटे यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक म्हणून संजय मजूकर, प्रा. सी. एम. गोरल, भरतकुमार मुरकुटे, किरण गिंडे, सी. एम. उघाडे, कल्लप्पा बंडाचे, मीनाजी नाईक, भोमाणी छत्र्यान्नावर, अस्मिता पाटील, चांगुणा मुरकुटे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून राघवेंद्र पाटील यांनी काम पाहिले.
नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचा नेताजी युवा संघटनेच्या वतीने नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येथे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन चेअरमन डी. जी. पाटील यांनी संचालक व सल्लागार मंडळाच्या सहकार्यातून सोसायटीची घोडदौड कायम ठेवून सोसायटीला प्रगतीपथावर घेऊन जाऊ असे आश्वासन दिले. तर व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी संस्थेच्या विकासासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. सत्कार बद्दल संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी नेताजी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, के. एन. पाटील, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, अनिल पाटील, पांडुरंग घाडी, शंकर मुरकुटे, वसंत मुचंडी, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवी कणबरकर आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन के. एन. पाटील यांनी केले. आभार संजय मजुकर यांनी मानले.