सतीश जारकीहोळी यांची सिध्दरामय्यांसाठी फलंदाजी
बंगळूर, ता. १५: काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व तयार होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. ते शनिवारी बंगळुरमध्ये बोलत होते.
ते म्हणाले की, जर कॉंग्रेसला पुढील निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांना सिद्धरामय्या यांची गरज आहे, असे सांगून त्यांनी सत्ता हस्तांतरणाच्या विरोधात आपले मत व्यक्त केले.
काँग्रेस आमदार रायरेड्डी यांच्या सिद्धरामय्या यांची पुढील निवडणुकीसाठी गरज असल्याच्या विधानाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “आम्हाला सिद्धरामय्या यांची गरज आहे. निवडणुकीतून निवृत्ती घेतल्यानंतरही ते राजकारणात राहिले पाहिजे. पुढची निवडणूक जिंकायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदावर राहिले पाहिजे, अशी त्यांनी ईच्छा व्यक्त केली.
पुढील निवडणुकीत जिंकण्यासाठी आपल्याला त्यांची गरज आहे. सतीश जारकीहोळी यांचा असा विश्वास आहे की नवीन नेतृत्व तयार होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य आहेत. आमचीही तीच आशा आहे. निवडणुकीतून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी राजकारणात सक्रिय राहिले पाहिजे. जर आपल्याला पुढची निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला सिद्धरामय्या यांची गरज आहे. नाहीतर निवडणूक जिंकणे कठीण होईल. त्यांनी आणखी एक कार्यकाळ राजकारणात रहावे, अशी ईच्छाही त्यांनी व्यक्त केली.
त्याच प्रसंगी केपीसीसी प्रदेशाध्यक्षांच्या बदलाबाबत बोलताना ते म्हणाले, “केपीसीसी अध्यक्षांच्या बदलाची मला माहिती नाही. यावर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेतील. कर्नाटकबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. इतर राज्यांसाठी चर्चा सुरू आहे. जेव्हा आमच्या राज्याची चर्चा येईल तेव्हा आम्ही आमचे मत व्यक्त करू, असे ते म्हणाले.
प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी बदलाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “प्रभारी बदलाची मला माहिती नाही. तो कॉंग्रेस हायकमांडचा विषय आहे. राहुल गांधी व इतर नेते यावर निर्णय घेतील, इतर राज्यांच्या व्यवस्थापनात बदल झाला आहे. सुरजेवाला आता इथे आहेत, ते म्हणाले, “मी याबद्दल काहीही बोलणार नाही.
राज्य काँग्रेसमध्ये सत्ता हस्तांतरण आणि केपीसीसी अध्यक्षपद बदलण्याच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. पण मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाजूने फलंदाजी करत आहेत. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून काम सुरू ठेवावे, असा एक मतप्रवाह वाढत आहे. दरम्यान, केपीसीसी अध्यक्ष बदलण्यासाठीही जोर सुरू झाला आहे.